Tuesday, 26 June 2012


मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक अष्टपैलु सॉफ्टवेअर आहे. यामध्ये स्तंभ व कॉलम्स यांचे एकत्रीकरण करुन वर्कबुक तयार केलेले असतात. त्यांना स्प्रेडशीट असेही म्हणतात. एक्सेलमध्ये आपण कमीत कमी वेळेत वेगवेगळे फॉर्मुले वापरुन अधि़काधिक माहितीवर अचुक आकडेमोड करु शकतो. यात गणितीय आकडेमोड, खरेदी विक्री नोंदी, आर्थिक नोंदी ठेवुन त्या माहितीवर प्रक्रिया करुन चार्टस व आकृत्यांच्या स्वरूपात तो डेटा प्रेझेंट करु शकतो. उदा. एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, कामगारांचे पगार पत्रक, वार्षिक नोंदी वगैरे गोष्टी एक्सलच्या सहाय्याने अचुक व चुटकीसरशी करु शकतो.

एम. एस वर्ड प्रमाणेच एम. एस. एक्सेल मध्ये टायटल बार, क्विक अँक्सेस टुलबार, ऑफीस बटण, मिनिमाईज, मॅक्झीमाईज, क्लोज, टॅबस व रिबनचा समावेश होतो.


नेम बॉक्स (Name Box) -
वर्कशीटच्या वरील भागात फॉर्मुलाबार शेजारी असणार्‍या बॉक्सला नेम बॉक्स असे म्हणतात. नेम बॉक्स हा अँक्टीव्ह असलेल्या सेलचा अँड्रेस दाखवतो. त्याचप्रमाणे एखाद्या सेलला किंवा सेलरेंज साठी दिलेले नाव दाखवितो.

फॉर्मुला बार (Formula Bar) –
या बारमध्ये सिलेक्ट केलेल्या सेलमधील मजकुर किंवा गणितीय सुत्र (Mathematical Formulas) दर्शविले जाते. त्याचप्रमाणे त्यात गरजेप्रमाणे बदल ही करता येतो.

वर्कबुक (Workbook) - वर्कबुक हे स्तंभ (Columns) आणि ओळी (Row) यापासुन तयार झालेले असते. त्याचप्रमाणे एका वर्कबुक मध्ये मुळतः (Default) तीन Sheets शीट्स असतात. (उदा. Sheet1, Sheet2, Sheet3)

स्तंभ (Column) - वर्कशीटमधील उभ्या ओळींना स्तंभ (Column) म्हणतात. एका शीटमध्ये एकुण १६३८४ स्तंभ (Column) असतात. या स्तंभाची नावे A,B,C….. याप्रमाणे असतात.

ओळी (Row) - वर्कशीटमधील आडव्या ओळी म्हणजे (Row) होय. वर्कशीटमध्ये एकुण १०,४८,५७६ आडव्या ओळी (Row) असतात. त्या ओळी अनुक्रमे १,२,३....... याप्रमाणे असतात.

चौकटी (Cell) - वर्कशीटमधील स्तंभ व ओळी एकत्र येऊन चौकटी (Cell) तयार होतात. वर्कशीटमधील स्तंभ (Column) १६३८४ व रो (Row) १०,४८,५७६ असल्यामुळे तिच्यामध्ये एकुण १६३८४ x १०,४८,५७६= इतक्या सेल्स असतात.

एम. एस. एक्सेल मध्ये समाविष्ट होणारे टॅब पुढीलप्रमाणे

होम टॅब (Home Tab) - या टॅब मध्ये नेहमी वापरात येणार्‍या
पर्यायांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे Cut, Copy, Paste, Formatting या पर्यायांप्रमाणेच गणितीय प्रक्रिया करण्यासाठी उपयोगात येणार्‍या कमांड्स म्हणजेच (Formula, Sorting, Filter, Conditional Formatting) यांसारखे पर्याय असतात.

इन्सर्ट टॅब (Insert Tab) - इन्सर्ट टॅबमध्ये (Pivot Table, Graphics, Charts, Hyperlinks) या पर्यायांचा समावेश होतो.


पेज ले आऊट (Page Lay Out) - पेज ले आऊट टॅबच्या मदतीने वर्कशीटमधील पेजचा समास (Margin), पेजचे स्वरुप (Orientation) व त्याचबरोबर पेजची इतर सेटिंग करु शकतो.
फॉर्मुला टॅब (Formula Tab) - या टॅबमधील (Formula) गणितीय सुत्रांचा वापर करुन आकडेमोड करु शकतो. उदा. (Sum, Average, Min, Max etc.)

डेटा (Data) - डेटा टॅबमधील कमांडचा वापर करुन इतर फाईलमधील मजकुर एक्सेल मध्ये आणता येतो. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी उपयोगात येणार्‍या कमांड्स असतात. त्यात (Sorting, Filtering)
रिव्ह्यु व व्ह्यु (Review & View) - या टॅबचा उपयोग एम. एस. वर्डमधील टॅबप्रमाणे होतो.

1 comment:

  1. How do Titanium pans work - Tioga Springs
    I have 2 types titanium water bottle of ceramic pans. My son's titanium hair trimmer a plastic pan, 2020 ford ecosport titanium a plastic titanium glasses tray, and a plastic tray. I will microtouch solo titanium make sure that he does what he is

    ReplyDelete