एम. एस वर्ड या सॉफ्टवेअरलाच वर्ड प्रोसेसिंग म्हणुनही ओळखले जाते. वर्ड प्रोसेसिंग या इंग्रजी शब्दाचा अर्थ शब्दांवर प्रक्रिया (अक्षरांवर प्रक्रिया) करणे असा होतो. यामध्ये वर्ड प्रोसेसिंगसाठी वापरली जाणारी जी सॉफ्टवेअर पॅकेजेस आहेत त्यांना वर्ड प्रोसेसर्स म्हटले जाते. उदा. अक्षरांचे वळण, आकार, ठळकपणा मजकुर अधोरेखीत करणे, बदल करणे इ.
दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला बर्याच वेळी काही पत्रे, टिपणे, विविध पत्रके, नोंदी अहवाल तयार करण्यासाठी वर्डचा उपयोग होतो. या कामांकरिता टाइपराईटरचाही वापर करता येतो परंतु यामध्ये अक्षरे प्रत्यक्ष कागदावर टाइप होत असल्याने सुधारणा करता येत नाही. उदा. शुध्दलेखन, वाक्यरचना, शब्दांची साईज या गोष्टी बदलता येत नाही.
अशा प्रकारचा फेरफार किवा बदल करण्यासाठी टाइपराईटर वर मर्यादा येतात त्यामुळे हेच काम आपण अगदी कमी वेळेत व आकर्षकरित्या संगणकावर वर्ड प्रोसेसर्सद्वारे करु शकतो. तर पुढीलप्रमाणे आपण मायक्रोसॉफ्ट वर्डची ओळख करुन घेऊया.
टायटल बार-
एम. एस वर्ड विंडो मधील सर्वात वरील बाजुला दिसणारी आकाशी पट्टी ज्यावरील मध्यभागात एम. एस. वर्ड डॉक्युमेंट असे लिहीलेले असते त्या पट्टीस टायटल बार असे म्हणतात. टायटलबारमुळे कोणते अँप्लीकेशन चालु आहे हे समजते व त्याचबरोबर त्या अँप्लीकेशन मधील कोणती फाईल ओपन केलेली आहे त्याचे नाव (Title) दाखविण्याचे काम टायटलबार करतो.
टायटलबार मधील उजव्या बाजुस कंट्रोल बटण आहे. त्यात मिनिमाईज, मॅकझीमाइज, क्लोज ही तीन बटणे असतात.
मिनिमाईज- या कमांडने आपल्याला विंडो छोटया स्वरुपात टास्कबारवर ठेवता येते.
रिस्टोर डाउन / मॅकझीमाइज - या कमांडने आपल्याला छोट्या स्वरुपातील विंडो संपुर्ण स्क्रिनवर मोठ्या स्वरुपात आणता येते.
क्लोज- या बटणाचा उपयोग करुन अँप्लीकेशन बंद करता येते.
क्वीक अँक्सेस टुलबार (Quick Access Toolbar) –
टायटलबार वरील डाव्या बाजुस ऑफीस बटणाशेजारील टुलबारला क्वीक अँक्सेस टुलबार म्हणतात. क्वीक अँक्सेस म्हणजेच सहज किंवा पटकन हाताळता येणे. या टुलबार मध्ये नेहमी वापरात येणार्या किंवा वारंवार लागणार्या कमांड्स शॉर्ट्कटच्या स्वरुपात एकाच ठिकाणी ठेवता येतात. ज्याचा वापर करुन आपण कमीतकमी वेळेत अधिकाधिक काम करु शकतो. उदा. सेव्ह, अन्डु, रिड्यु.
ऑफीस बटण (Office Button) - हे बटण टायटल बारच्या उजव्या बाजुच्या अगदी टोकावर असते. ह्या बटणावर क्लिक केल्यानंतर पुढीलप्रमाणे पर्याय दिसतात. ज्यास मेनु (Menu) असे म्हणतात.
उदा. New, Open, Save, Save As, Print, Print Preview, Properties, Send, Close
न्यु (New) - या पर्यायाचा उपयोग करुन वर्ड मध्ये नवीन पेज घेता येते.
ओपन (Open) - ओपन या पर्यायामुळे वर्ड मध्ये सेव्ह केलेली फाईल (डॉक्युमेंटस) आपल्या गरजेप्रमाणे उघडु शकतो व त्यांचा वेळोवेळी उपयोग करुन घेऊ शकतो.
सेव्ह (Save) - सेव्ह म्हणजे साठवुन ठेवणे. यामुळे नवीन तयार केलेली डॉक्युमेंटस विशिष्ट नावे देऊन सेव्ह करता येतात. जेणेकरुन हव्या त्यावेळी आपण त्यांचा उपयोग करु शकतो.
सेव्ह अँज (Save As) - या पर्यायामुळे एकदा सेव्ह केलेली डॉक्युमेंटस ( फाईल ) पुन्हा वेगळे नाव देउन सेव्ह करता येते. ज्यामुळे पहिल्या डॉक्युमेंट मधील माहिती नाहिशी झाली किंवा इतर कारणांमुळे बदलली तर तिची दुसरी प्रत उपयोगात येते.
प्रिंट- (Print) प्रिंट या पर्यायाच्या सहाय्याने वर्ड मध्ये टाईप केलेली माहिती छापील स्वरुपात उपलब्ध करता येते. त्यासाठी प्रिंट या पर्यायावर क्लिक करावी. त्यानंतर स्क्रिनवर पुढीलप्रमाणे डायलॉग बॉक्स दिसेल.
पेज रेंज- (Page Range)
All - या ऑप्शनवर क्लिक केल्याने डॉक्युमेंट मधील सर्व पेजेसची प्रिंट काढता येते.
Current Page - या ऑप्शनच्या सहाय्याने फक्त स्क्रिनवर दिसणारे पेज ज्यामध्ये कर्सर असेल त्याच पेजची प्रिंट काढता येते.
Pages - या मध्ये एका डॉक्युमेंट मधील पेजेसची ठराविक रेंजची प्रिंट काढता येते.
उदा. एखाद्या डॉक्युमेंटमध्ये एकुण १० पेजेस असतील तर त्यापैकी पहिले, तिसरे, सहावे अशी ठराविक पेजेसची प्रिंट काढता येते. त्यासाठी आपणास त्या पेजेसचे क्रमांक द्यावे. (१, ३, ६) याप्रमाणे
Number of Copies - यामध्ये डॉक्युमेंट मधील पेजेसच्या किती प्रती प्रिंट करावयाच्या आहेत ती संख्या टाकता येते. त्याप्रमाणे पेजेस प्रिंट होतात.
प्रिंट प्रिव्ह्यु (Print Preview)- या पर्यायाच्या सहाय्याने एखादे पेज प्रिंट केल्यानंतर ते कसे दिसेल हे प्रिंट काढण्याअगोदर बघता येते. ज्यामुळे आपण त्या पेजवरील मजकुर, समास या गोष्टींमध्ये काही बदल करायाचा असेल तर ते प्रिंट प्रिव्ह्यु मध्ये समजते.
प्रॉपर्टिज (Propeties)- म्हणजेच एखाद्या डॉक्युमेंटचा तपशील होय. ज्यामध्ये आपण त्या डॉक्युमेंटचे शीर्षक, लेखक, अभिप्राय इ. गोष्टी विषयी माहिती मिळवु शकतो.
सेंड (Send) - या पर्यायाच्या सहाय्याने आपण डॉक्युमेंट ई-मेल किंवा फॅक्स द्वारे पाठवु शकतो.
क्लोज (Close) - ह्या ऑप्शनचा उपयोग करुन चालु डॉक्युमेंट बंद करता येते.
एक्झीट वर्ड (Exit Word) - या पर्यायाचा उपयोग करुन मायक्रोसॉफ्ट वर्ड बंद करता येते
.
रिबन (The Ribbon)
रिबन म्हणजे डॉक्युमेंटच्या वरच्या बाजुला दिसणारी सर्व कमांड्सची ग्रुपच्या स्वरुपात विभागलेली पट्टी होय.
सुपर टुलटीप (Super-Tooltip) -
जेव्हा आपण रिबनमधील एखाद्या कमांडवर माऊस पॉईंटर ठेवतो तेव्हा त्या कमांडचा उपयोग किंवा वर्णन दर्शविणारा बॉक्स म्हणजेच सुपर टुलटीप होय. त्यामध्ये विशिष्ट कमांडचे संक्षिप्त रुप (Shortcut) दाखविले जाते.
व्हर्टी़कल व हॉरिझंटल स्क्रोल बार (Vertical & Horizontol Scroll Bar) - व्हर्टीकल स्क्रोलबारने पेज वर (Up) किंवा खाली (Down) सरकवता येते. त्याचप्रमाणे हॉरिझंटल स्क्रोल बारच्या सहाय्याने पेज डावीकडे (Left) किंवा उजवीकडे (Right) सरकवता येते.
टॅब (Tab) - म्हणजे वेगवेगळया पर्यायाचा संच. यामध्ये Home, Insert, Page Layout, References, Mailings, Review, and View इ. टॅब आहेत.
होम टॅब (Home Tab) - या टॅबमध्ये नेहमीच्या वापरातील फॉरमॅटींग करण्यासाठीचे पर्याय म्हणजेच कट, कॉपी, पेस्ट, अक्षरांची स्टाईल्स, नंबर आणि बुलेट्स, यासारखे पर्याय असतात.
ईन्सर्ट टॅब (Insert Tab) - ईन्सर्ट म्हणजे टाकणे. या टॅबमुळे डॉक्युमेंटमध्ये वेगवेगळे Picture, Clipart, Pages, आणि Textbox ईन्सर्ट करु शकतो.
पेज लेआऊट टॅब (Page Layout) - या टॅबमध्ये पेजेसची वेगवेगळया पध्दतीने मांडणी करण्यासाठीचे पर्याय असतात. त्यात समास (Margin), पेजेसचे उभे (Potrait), आडवे (Landscape) स्वरुप, पेज कलर, वगैरे गोष्टी येतात.
रेफ्रंसेस टॅब (References)- या टॅबमध्ये टिप (Footnote), अनुक्रमणिका (Index), संदर्भसुची (Citations) अशा व्यावसायिक दृष्टया उपयोगात पडणार्या कमांड्स असतात.
मेलिंग्स टॅब (Mailings Tab) - यामध्ये पत्र व्यवहारासाठी आवश्यक असणारे पर्याय असतात.
रिव्ह्यु (Review) - या टॅबमध्ये शब्दांचे स्पेलिंग, वाक्यांमधील ग्रामर, शब्दकोश यांचा समावेश होतो.
व्ह्यु (View) - यामध्ये आपण डॉक्युमेंट हे वेगवेगळया व्ह्युमध्ये बघु शकतो.
0 comments:
Post a Comment